पुस्तकाबद्दल
इकिगाई -: इकिगाई काय आहे? ‘इकिगाई’ जीवन जगण्याची एक अशी कला आहे जी मानवाला नेहमी आपल्या उद्देशाप्रति सावधपणे प्रेरित करते. इकिगाईचा अर्थ आहे, जीवनाला उद्देशपूर्ण बनवणे. इकिगाई सिद्धांताचे पालन करणाऱ्या लोकांची सकाळ कोणत्यातरी उद्देशासाठी असते. हेच कारण आहे की दुसऱ्या महायुद्धात उद्धवस्त झालेल्या जपानने आपल्या देशाला केवळ विकसितच केले नाही, तर संपूर्ण जगात एक समृद्ध आणि दीर्घायु असणारा देश देखील बनवले. हे कसे शक्य झाले? हे सर्व शक्य झाले, ईकिगाई जीवन पद्धती स्वीकारल्याने. तुम्हालाही जर चांगले आणि उद्देशपूर्ण दीर्घ जीवन जगायचे असेल तर हे पुस्तक तुमच्या अत्यंत उपयोगाचे आहे. हे पुस्तक तुम्हाला केवळ सैद्धांतिक गोष्टीच सांगत नाही तर ईकिगाई जीवन कसे जगायचे, हे व्यावहारीक उदाहरणे देऊन पण समजावले आहे. त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की जापानची जीवनपद्धती कशी आहे? त्या ठिकाणची माणसं कसे त्यांच्या जीवनाचा उद्देश प्राप्त करतात ? कसा समाजात त्यांच्या वरिष्ठपणाचा सन्मान होतो? ते असे काय खातात- पितात की ज्यामुळे त्यांची नोंद जगात सार्वधिक आयुष्य लाभलेल्या लोकांत होते? एक यशस्वी जीवन जगणे आणि सदा नवे विक्रम करण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला आवश्य पसंत पडेल.
इकिगाई या शब्दाचा अर्थ काय आहे?
याचा अर्थ जीवनाला उद्देशपूर्ण आणि अर्थपूर्ण बनवणे होय.
जपानी लोक इकिगाईचा अवलंब कसा करतात?
ते दररोज सकाळी एखाद्या उद्देशाने दिवसाची सुरुवात करतात.
दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने विकास कसा साधला?
इकिगाई जीवनशैली स्वीकारल्यामुळे जपान पुन्हा उभा राहून समृद्ध व दीर्घायुषी राष्ट्र बनला.
जपानी लोकांचे दीर्घायुष्याचे रहस्य काय आहे?
त्यांची आहारशैली, शिस्तबद्ध जीवनशैली आणि ईकिगाई तत्वांचा अवलंब.
इकिगाई जीवनात सकारात्मकता कशी आणते?
ते माणसाला प्रत्येक दिवस एखाद्या ध्येयाने जगायला प्रवृत्त करते.